Bigg Boss Marathi 5: "माझ्यापेक्षा लसूण जास्त महत्त्वाचा आहे?..." निक्की आणि अरबाजमध्ये झालं कडाक्याचं भांडण

Nikki Tamboli, Arbaz Patel: 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाजमुळे निक्की प्रचंड दुखावलेली दिसत आहे.
Bigg Boss Marathi 5: "माझ्यापेक्षा लसूण जास्त महत्त्वाचा आहे?..." निक्की आणि अरबाजमध्ये झालं कडाक्याचं भांडण
Published on

Bigg Boss Marathi Day 13 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांनी नॉमिनेशन टास्कदरम्यान आवश्यक किराणा सामान विकत घेतला. या टास्कदरम्यान पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घरातील सदस्य नॉमिनेट झाले. नॉमिनेट झाल्याने निक्कीचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला. आता लसणाच्या ठेच्यासारखा निक्कीचा राग अरबाज पचवू शकेल का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाजमुळे निक्की प्रचंड दुखावलेली दिसत आहे. वैभव आणि जान्हवी निक्कीला समजावत दिसत आहे. दरम्यान "तुला वाचवण्यासाठीच अरबाज प्रयत्न करत होता", असं वैभव निक्कीला म्हणत आहे. त्यावर निक्की म्हणते,"गेलं खड्ड्यात...एवढं प्रेम दाखवूनदेखील मी नॉमिनेट झाली आहे".

Bigg Boss Marathi 5: "माझ्यापेक्षा लसूण जास्त महत्त्वाचा आहे?..." निक्की आणि अरबाजमध्ये झालं कडाक्याचं भांडण
Bigg Boss Marathi 5: "मला तू नॅचरली अट्रॅक्टीव्ह वाटतो..." बिग बॉस मराठी'च्या घरात रॅपर गर्ल कोणाच्या प्रेमात पडली?
Bigg Boss Marathi 5: "माझ्यापेक्षा लसूण जास्त महत्त्वाचा आहे?..." निक्की आणि अरबाजमध्ये झालं कडाक्याचं भांडण
निक्की तांबोळी ते वर्षा उसगांवकर...बिग बॉस मराठी ५ च्या घरातील स्पर्धकांना किती मिळतंय मानधन?

पॅडीने केली अभिजीतची नक्कल, सदस्यांनी केली धमाल

'बिग बॉस मराठी'च्या घरात पॅडीने अभिजीतची नक्कल केली आहे. अभिजीतची नक्कल करत पॅडी म्हणतोय,"हे बघा मित्रांनो.. आपण आज इथे आलो आहोत तर आपल्याला टिकून राहणं खूप गरजेचं आहे. गाणं ऐकूण तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. शक्ती आहे तर आपल्याकडे युक्ती आहे". दरम्यान घरातील इतर सदस्य धमाल करताना दिसत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in