Bigg Boss Marathi 5: "सगळ्यांना माहिती आहे तुला अक्कल नाहीये..." जान्हवी आणि घनःश्याममध्ये पडली ठिणगी

Jahnavi Killekar, Ghanshyam Darode: 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये जान्हवी घन:श्यामसोबत वाद घालताना दिसत आहे.
Bigg Boss Marathi 5: "सगळ्यांना माहिती आहे तुला अक्कल नाहीये..." जान्हवी आणि घनःश्याममध्ये पडली ठिणगी
Published on

Bigg Boss Marathi New Season Day 38 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात काल नॉमिनेशन टास्क पार पडल्याने वातावरण तापलेलं आहे. नॉमिनेट झालेले सदस्य नॉमिनेट करणाऱ्या सदस्यांवर आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. आजच्या भागात जान्हवी आणि घन:श्यामच्या वादाने टोक गाठलेलं पाहायला मिळणार आहे. पण त्यांच्यातील वादामुळे इतर सदस्यांना मात्र काहीही फरक पडणार नाही आहे.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये जान्हवी घन:श्यामसोबत वाद घालत म्हणत आहे,"सगळ्यांना माहिती आहे तुला अक्कल नाही. अख्या घराने तुला नॉमिनेट केलं आहे. त्यावर घन:श्याम म्हणतो,"मला फरक पडत नाही. तू जेलमध्ये राहून आली आहेस. तुला अक्कल नाही". पुढे घन:श्यामला फटकारत जान्हवी म्हणते,"अक्कल शून्य आहेस तू".

Bigg Boss Marathi 5: "सगळ्यांना माहिती आहे तुला अक्कल नाहीये..." जान्हवी आणि घनःश्याममध्ये पडली ठिणगी
Bigg Boss Marathi 5: "मी विलन ठरली..." निक्कीला कॅप्टनसी पडली भारी
Bigg Boss Marathi 5: "सगळ्यांना माहिती आहे तुला अक्कल नाहीये..." जान्हवी आणि घनःश्याममध्ये पडली ठिणगी
Bigg Boss Marathi 5:"तुम्ही नाटकी आणि ढोंगी..." भाऊच्या धक्क्यावर रितेशने जान्हवीला दाखवली तिची जागा

पॅडी दादा घेतायत सूरजची शिकवणी

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात पॅडी दादा सूरजची शिकवणी घेताना दिसणार आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये सूरजने अरबाजला नॉमिनेट केलं असलं तर नॉमिनेट करण्यासाठी त्याच्याकडे योग्य मुद्दे नव्हते. त्यामुळे सूरजला पॅडी दादा म्हणत आहेत,"अरबाजला नॉमिनेट करायला हवं होतंस..तू तुझा निर्णय बदलायला नको होतास. अरबाजबद्दल योग्य मुद्दे मांडायला हवे होते. गेम सुरू असताना लक्ष ठेवायचं आणि ते लक्षात पण ठेवायचं. प्रयत्न करणं सोडू नको".

logo
marathi.freepressjournal.in