Bigg Boss Marathi New Season: 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या आठवड्याची दणक्यात सुरुवात झाली आहे. तीन आठवड्यात घरात दोन गट झाले असून दोन्ही गटांची उत्तम खेळी 'बिग बॉस'प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. तीन आठवड्यातच घरातील सदस्यांमध्ये मैत्रीचं आणि बहिण भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. आजच्या भागात अभिजीतमुळे अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली पाहायला मिळणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात निक्की आणि घन:श्याममध्ये कल्ला झालेला पाहायला मिळाला. आता आजच्या भागाचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली दिसून येत आहे. प्रोमोमध्ये निक्की अभिजीतला म्हणत आहे,"तुला वाटतं का की मी मनापासून माफी मागत नाही". त्यावर अभिजीत म्हणतो,"हा तू मनापासून माफी मागते". निक्की अभिजीतसोबत बोलल्याने अरबाजचा राग अनावर झाला आहे. प्रोमोमध्ये तो निक्की बोलताना दिसत आहे की, " तू भवऱ्यासारखी फिरतेय..."आता अभिजीतमुळे निक्की-अभिजीत एकमेकांपासून दूरावणार का? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात कधी कोणामध्ये वाद होईल हे सांगू शकत नाही. दोन सख्खे मित्र कधी वैरी होतील हे सांगता येत नाही. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागातही प्रेक्षकांना हेच चित्र पाहायला मिळेल.