Bigg Boss Marathi 5: निक्कीने पुन्हा मर्यादा ओलांडली! वर्षा उसगांवकरांच्या मातृत्वावर नको ते बोलली; नेटकरी-कलाकार भडकले

Nikki Tamboli, Varsha Usgaonkar: निक्कीने ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या मातृत्वाबद्दल टिप्पणी केली. तिच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र तिच्याबद्दल नाराजी दिसून येत आहे.
Bigg Boss Marathi 5: निक्कीने पुन्हा मर्यादा ओलांडली! वर्षा उसगांवकरांच्या मातृत्वावर नको ते बोलली; नेटकरी-कलाकार भडकले
Published on

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू झाला असून गेल्या १५ दिवसात घरातील सर्व सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या दोन छोट्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क झाला. या टास्कमध्ये दोन टीम होत्या. या टास्कमध्ये निक्की आणि तिची टीम जिंकली. परंतु हा विजय चुकीचं वागून जिंकल्याचा आरोप टीम बी कडून करण्यात आला. यादरम्यान निक्कीने ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या मातृत्वाबद्दल टिप्पणी केली. तिच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र तिच्याबद्दल नाराजी दिसून येत आहे.

नक्की काय झालं?

टास्क सुरु असताना टीम निक्कीने 'टीम बी'च्या सदस्यांच्या बाहुलीचा एक पाय तोडला. हे बघून वर्षा यांनी “निक्कीने बाहुलीची मुंडी काय, तंगडंही तोडलं” असं म्हटलं. यावर निक्कीने "यांच्या भावना बघितल्या का? आईचं प्रेम कसं समजेल जाऊदेत." अशी टिप्पणी केली. हे वाक्य निक्कीने बोलताच अंकिता भावुक होऊन निक्कीला सुनावते की, "तुझं हे बोलणं अतिशय चुकीचं आहे. आताच बिग बॉस म्हणाले… हा मानवी भावनांचा खेळ आहे आणि मॅमना तू जे बोलतेय…ते सहन करणार नाही. त्यांच्या मातृत्त्वावर जाऊ नकोस. निक्की तू चुकीचं बोलतेस.” निक्कीचा हा अरेरावीपणा पाहून वर्षा यांनी म्हटलं, “तू जे केलंय तेच मी सांगितलं… शब्द हे बाणासारखे असतात आणि ते परत घेता येत नाहीत एवढं लक्षात ठेव निक्की, एकदा बाण गेला की गेला.” या वादानंतर जान्हवी, पंढरीनाथसुद्धा निक्कीच्या वागणुकीला चुकीचं ठरवतात.

सगळा वाद झाल्यावर निक्की याबद्दल अरबाजशी बोलताना दिसते की, "मला, त्यांना मुलं नाहीत हे मला माहिती नव्हतं… धनंजय सरांनी मला याबद्दल केव्हातरी सांगितलं होतं. पण टास्कदरम्यान त्यासुद्धा मला ‘काळ्या मनाची आई’ असं वगैरे म्हणाल्या होत्या...तेव्हाच मला राग आला होता. आता त्या मला “बाळाच्या तंगड्या तोडल्या” असं बोलून हसायला लागल्या. ते ऐकून मी त्यांना बोलले की, एका आईचं प्रेम काय असतं तुम्हाला काय माहिती? हे असं माझ्या तोंडून निघालं पण, आता मला हा वाद मला वाढवायचा नाहीये.”

Bigg Boss Marathi 5: निक्कीने पुन्हा मर्यादा ओलांडली! वर्षा उसगांवकरांच्या मातृत्वावर नको ते बोलली; नेटकरी-कलाकार भडकले
Bigg Boss Marathi 5: निक्की झाली ‘आई’, घरात आलेल्या दोन छोट्या पाहुण्यांसोबत रंगणार आजचा एपिसोड

निक्कीकने मागितली माफी

अखेरीस दुसऱ्या दिवशी सकाळी किचनमध्ये काम करताना निक्की वर्षा यांची माफी मागते. “मॅम मी काल जे काही बोलली त्यासाठी सॉरी... मला वाईट वाटलं होतं. तुमच्याशी कसं बोलू हे समजत नव्हतं. मी आईबद्दल जे काही बोलले त्यासाठी मनापासून सॉरी”, असं निक्की म्हणते. त्यावर वर्षा तिला म्हणतात की, “तू जे बोललीस ते अक्षम्य आहे. पण ठीके.”

निक्कीवर नेटकरी आणि कलाकार भडकले

बिग बॉस मराठीच्या घरात घडलेला प्रकार बघून निक्कीवरती नेटकरी चांगलेच भडकले आहेत. सोशल मीडिया माध्यमातून व्यक्त होत नेटकऱ्यांनी निक्कीला शो मधून बाहेर काढावे अशी मागणीही केली आहे. याशिवाय अनेक कलाकारांनी निक्कीच्या विरोधात पोस्ट टाकली आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीजनच्या स्पर्धक अभिनेता अभिजित केळकर आणि पोस्ट टाकली आहे. " ... एखाद्या बाईच्या मातृत्वावर बोलताना ती कधी आई झाली आहे की नाही आणि ते आपल्याला माहीत आहे की नाही हे कसं मॅटर करतं? मुळात दुसऱ्याच्या इतक्या खाजगी आणि संवेदनशील विषयावर बोलणाऱ्या माणसांचं मानसिक आरोग्य पुन्हा एकदा तपासायला हवं... पण वर्षा ताई, तुमच्या संयमाला सलाम." ही पोस्ट करत त्याने अंकिताने वर्षा यांच्यासाठी स्टँड घेतल्याने कौतुकही केलं आहे.

याशिवाय अभिनेत्री अनघा अतुलनेही सोशल मीडियावर पोस्ट करत " बिग बॉस मराठी.. एक विनंती आहे. एक दिवस वाईल्ड कार्ड एन्ट्री द्या. बाई आणि बुगु बुगुच्या श्रीमुखात लगावयाची आहे." असं म्हणतं संताप व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in