बिग बॉसचे 'हे' चार कलाकार दिसणार 'या' चित्रपटात

'दिल दोस्ती दिवानगी' चित्रपटाची इंडस्ट्रीत चर्चा
बिग बॉसचे 'हे' चार कलाकार दिसणार 'या' चित्रपटात

'बिग बॉस मराठी' हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंत चार सीझन चांगलेच गाजले होते. ‘बिग बॉस’ गाजवलेली मंडळी आता एका मराठी चित्रपटात दिसणार आहेत. वीणा जगताप आणि स्मिता गोंदकर या लोकप्रिय चेहऱ्यांसोबत सुरेख कुडची आणि विद्याधर जोशी हे एकाच चित्रपटात दिसतील. या चौघांची भूमिका असलेला ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट येत्या ६ ऑक्टॉबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

या चित्रपटात विद्याधर जोशी मायकेल ब्रिगेन्झा तर सुरेखा कुडची मिस मेरी ही कॅथलिक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. स्मिता गोंदकर रिया आणि वीणा जगताप श्रियाच्या ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहे. मैत्री, प्रेम त्यानंतरचं आयुष्य यांत अडकलेल्या प्रेमवीरांची कथा ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटात मांडण्यात आली आहे. या प्रेमकथेच्या प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारा हा चित्रपट असून प्रेक्षक यात नक्कीच गुंतून जातील असा विश्वास हे चौघंही व्यक्त करतात. या चौघांसोबत कश्यप परुळेकर, चिराग पाटील, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग, प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.चित्रपटाचं शूटिंग गोव्यामध्ये पार पडलं आहे.

'दिल दोस्ती दिवानगी’ हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in