Video : गौहर खानच्या मुलाच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये गोंधळ, BMC ने एंट्री गेट उखडून टाकला

Gauahar Khan Son Birthday Party: अभिनेत्री गौहर खान आणि तिचा नवरा जैद दरबारने त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाची जंगल-थीम असलेली पार्टी मुंबईतील एका पॉश हॉटेलमध्ये आयोजित केली होती.
Video : गौहर खानच्या मुलाच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये गोंधळ, BMC ने एंट्री गेट उखडून टाकला

Gauahar Khan's Son's Birthday Bash In Mumbai: टीव्ही अभिनेत्री गौहर खान आणि तिचा पती झैद दरबार नेहमीच चर्चेत असतात. आज १० मे रोजी त्यांचा मुलगा जेहान एक वर्षाचा झाला. या खास प्रसंगी त्यांनी गुरुवारी (९ मे) रोजी एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले. या जोडप्याने मुंबईतील एका पॉश हॉटेलमध्ये जंगल-थीम असलेली वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. मात्र, हॉटेलच्या प्रवेशद्वाराबाहेरील फूटपाथवर बसवलेल्या एंट्री गेटवर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत ते हटवण्याची मागणी केली.

वाढदिवसाच्या पार्टीची जंगल-थीम असल्याने हॉटेलच्या प्रवेशद्वारावर एक मोठा जंगल-थीम असलेल्या गेटची सजावट केली गेली होती. हा सुंदर गेट येणाऱ्या पाहुण्यांचे पार्टीमध्ये स्वागत करत होता. पण हा गेट हॉटेलच्या प्रवेशद्वाराबाहेरील फुटपाथवर उभारण्यात आल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला.

माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सुरुवातीला हॉटेल कर्मचारी आणि कार्यक्रम आयोजकांना फूटपाथवर उभारलेले गेट काढण्यास सांगितले. परंतु त्यांनी गेट काढून टाकण्यास नकार दिला. यानंतर अधिकाऱ्यांनी स्वतःच हा गेट उखडून काढत ते ट्रकमध्ये भरून घेऊन गेले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, बीएमसीचे अधिकारी तिथे उपस्थित लोकांशी बोलत सजावट काढून टाकण्याची मागणी करताना दिसत आहे. सांगूनही न ऐकल्यावर अधिकारी संपूर्ण गेट उखडून टाकताना दिसत आहेत.

दरम्यान, गौहर आणि झैद यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला माही विज, हिना खान, देबिना बोनर्जी, पंखुरी अवस्थी आणि इतर अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in