वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी गिफ्ट! बॉबीचा 'कंगुवा' चित्रपटातील जबरदस्त लूक रिलीज

बॉबीने अबरारची खलनायकी भूमिका साकारून सर्वांच्या मन जिंकली होती. आज बॉबी देओलचा वाढदिवस आहे.
वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी गिफ्ट! बॉबीचा 'कंगुवा' चित्रपटातील जबरदस्त लूक रिलीज
PM

बॉलिवूडचा अभिनेता बॉबी देओलने २०२३ ला 'ॲनिमल' या चित्रपटातून लोकांच्या मनावर परत एकदा राज्य केले. बॉबीने अबरारची खलनायकाची भूमिका साकारून सर्वांचीा मनं जिंकली होती. आज बॉबी देओलचा वाढदिवस आहे. बॉबीच्या वाढदिवसानिमित्त बहुप्रतिक्षित दाक्षिणात्य 'कंगुवा' चित्रपटाच्या टिमने त्याचा चित्रपटातील लूक शेअर केला आहे. हा तमिळ चित्रपट असणार आहे. शनिवारी, २७ जानेवारी रोजी सोशल मीडियावर चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेत असलेला अभिनेता बॉबी देओलचा लूक शेअर करण्यात आला. यामध्ये बॉबी पराक्रमी उधीरन याची भूमिका साकरणार आहे.

पोस्टद्वारे केला लूक शेअर -

बॉबीचा लूक शेअर करताना"निर्दयी. शक्तिशाली. अविस्मरणीय. आमचा #उधीरन, #लॉर्ड बॉबी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, अशी पोस्ट करण्यात आली आहे. सिवा दिग्दर्शित 'कंगुवा' या चित्रपटात सुरिया, दिशा पटानी, नटराजन सुब्रमण्यम, जगपती बाबू, योगी बाबू, रेडिन किंग्सले, कोवई सरला इत्यादी लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाचे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे आणि निर्मात्यांनी याआधीच चित्रपटातील एक टिझर आणि पोस्टर शेअर केलंय. ज्यात चित्रपटातील सुरियाचा अंगावर काटा आणणारा लूक दिसून येतो.

दिशा पटानी आणि बॉबी देओल साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण-

या चित्रपटात भारतातील भिन्न संस्कृती दर्शविणारे घटक दिसणार आहेत. याशिवाय काल्पनिक कथांमध्ये प्राचीन तमिळ संस्कृतीशी संबंधित अनेक संदर्भ आणि तथ्ये पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट २०२४ च्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय 'कंगुवा' १० वेगवेगळ्या भाषांमध्ये 3D मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटातून दिशा पटानी आणि बॉबी देओल साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in