मुंबई: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तिचे चाहते फक्त फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. आजकाल ती चित्रपटांपेक्षा रिॲलिटी शोमध्ये जास्त दिसत आहे. नुकतीच माधुरी दीक्षितने नवीन रेंज रोव्हर लक्झरी कार खरेदी केली आहे.
माधुरीनं पती डॉ. श्रीराम नेनेसोबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ती एका नवीन कारमध्ये दिसली होती. ही कार आहे Range Rover Autobiography LWB 3.0 SUV माधुरीनं या कारचं डिझेल व्हेरियंट विकत घेतले आहे.
Range Rover Autobiography मध्ये नेमकं काय आहे खास?
माधुरीनं विकत घेतलेली नवी रेंज रोव्हर नवीन ग्रिल आणि हेडलॅम्पसह अधिक पॉलिश डिझाइनमध्ये दिसत आहे. हे मॉडेल 23 इंच अलॉय व्हीलसह येते. या SUVच्या रिअर स्पोर्ट्स ब्लॅक्ड-आउट टेललाइट्स, टेलगेटवरील ब्लॅक ॲक्सेंटशी जोडलेल्या आहेत. त्यामुळं ते टर्न इंडिकेटरशी एकरूप झाल्याचं दिसतं.
या कारमध्ये 13.7-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफीच्या सेंटर कन्सोलमध्ये हॅप्टिक फीडबॅकसह मोठा 13.7-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे. तर मागील प्रवाशांसाठीही 11.4-इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले देण्यात आला आहे.
यासोबतच रेंज रोव्हरमध्ये 1600 वॅट, 35-स्पीकर मेरिडियन सिग्नेचर साउंड सिस्टीमही उपलब्ध आहे. ऑटोबायोग्राफीच्या बाबतीत सर्वात खास गोष्ट म्हणजे तिच्या हेडरेस्टमध्येही स्पीकर स्थापित करण्यात आला आहे.
रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी पॉवरट्रेन:
रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी 3 इंजिन पर्यायांमध्ये देण्यात आली आहे. यामध्ये 3.0-लिटर पेट्रोल माइल्ड-हायब्रिड, 3.0-लिटर टर्बो-डिझेल आणि 4.4-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिनांचा समावेश आहे.
तिचे 3.0-लिटर पेट्रोल माइल्ड-हायब्रिड 394 bhp पॉवर आणि 550 Nm टॉर्क निर्माण करते. टर्बो-डिझेल इंजिन 346 bhp पॉवर आणि 700 Nm टॉर्क निर्माण करते, तर ट्विन-टर्बो V8 इंजिन 523 bhp पॉवर आणि 750 Nm टॉर्क निर्माण करते.
ही SUV 5.3 सेकंदात 0-100 चा वेग वाढवते. सर्व मॉडेल्स ऑल-व्हील ड्राइव्ह आणि एक्टिव्ह-लॉकिंग रियर डिफरेंशियलसह येतात. सुरक्षिततेसाठी कारमध्ये ADAS तंत्रज्ञान देण्यात आलं आहे.
किती आहे किंमत?
माधुरीनं खरेदी केलेल्या या रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी एलडब्ल्यूबी 3.0 या कारची भारतीय बाजारातील किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे. माधुरी दीक्षितकडे पूर्वीपासूनच Mercedes Maybach S560 आणि Porsche 911 Turbo S सारख्या लक्झरी कार आहेत.