शाहरुख खान रुग्णालयात

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची प्रकृती उष्माघातामुळे अचानक बिघडली...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अहमदाबाद : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची प्रकृती उष्माघातामुळे अचानक बिघडली असून उपचारांसाठी त्याला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील शाहरुख खानच्या मालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स यंदा प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. २१ मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील आपल्या संघाचा सामना पाहण्यासाठी शाहरुख खान अहमदाबादच्या स्टेडियमवर हजर होता. या सामन्यानंतर शाहरुखची तब्येत बिघडली. प्राथमिक उपचारांनंतरही बरे न वाटल्याने त्याला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in