Salman Khan : 'या' प्रकरणात सलमानला उच्च न्यायालयाचा दिलासा

सलमान सायकल चालवत असताना त्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला म्हणून शिवीगाळ आणि मारहाण
Bollywood Actor Salman khan
Bollywood Actor Salman khanANI

पत्रकाराला मारहाण केल्याच्या आरोपप्रकरणी अभिनेता सलमान खानविरुद्ध (Salman Khan) दाखल करण्यात आलेली तक्रार उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली. त्यामुळे सलमानला दिलासा मिळाला आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात सलमानने दाखल केलेल्या अपीलवर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने गुरुवारी सलमानने दाखल केलेल्या अपीलला परवानगी दिली. त्याच्याविरुद्धची तक्रारही रद्द करण्यात आली.

पत्रकार अशोक पांडे यांनी अंधेरी कोर्टात तक्रार दाखल केली होती की, सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांनी सलमान सायकल चालवत असताना त्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला म्हणून शिवीगाळ आणि मारहाण केली. या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाला समन्स बजावले आणि ५ एप्रिलला हजर राहण्याचे आदेश दिले. या निर्णयाविरोधात सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, सलमानच्या याचिकेवर निर्णय राखून ठेवण्यापूर्वी न्यायालयाने पांडेने युक्तिवादाच्या वेळी पोलिसांत तक्रार दाखल करताना आणि नंतर दंडाधिकार्‍यांकडे तक्रार केल्यावर दिलेली माहिती यांच्यातील तफावत निदर्शनास आणून दिली. पोलिसांत तक्रार दाखल करताना सलमानने आपला फोन हिसकावून घेतला, असे पांडेने म्हटले होते, मात्र दंडाधिकाऱ्यांसमोर केलेल्या तक्रारीत पांडेने आपल्याला मारहाण केल्याचे म्हटले होते. दोन महिन्यांनंतर तक्रार दाखल करण्याच्या पांडे यांच्या भूमिकेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्याय दंडाधिकाऱ्यांनी सलमानला समन्स बजावताना कायदेशीर प्रक्रियेचे योग्य पालन केले नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in