'आदिपुरुष' चित्रपटावर बंदीची मागणी, मोदींना पत्रं

'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'ची मागणी
'आदिपुरुष' चित्रपटावर बंदीची मागणी, मोदींना पत्रं

'आदिपुरुष' चित्रपट सतत नव्या वादात सापडत आहे. नुकतंच 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'ने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आदिपुरुष चित्रपटाचे प्रदर्शन तात्काळ थांबवावे अशी मागणी केली आहे. त्याचसोबत चित्रपटगृहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील या चित्रपटावर भविष्यात बंदी घालण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे.

'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'चे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी 'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, 'दिग्दर्शक ओम राऊत, संवाद लेखक मनोज मुंतशिर शुक्ला आणि चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची गरज आहे. हा चित्रपट कोणत्या रामायणावर आधारित आहे, चित्रपटातील पात्रांचे संवाद,पेहराव ,प्रसंग हे सगळेच रामायणापेक्षा वेगळे आहे. पात्रांना दिलेली भाषा अतिशय खालच्या दर्जाची आहे.

''केवळ हिंदूच नव्हे तर इतर धर्मातील लोकांच्या भावना सुद्धा यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटावर सरकारने तात्काळ बंदी घालावी, अशी आम्ही मागणी करतो. सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पास केलाच कसा हासुद्धा मोठा प्रश्न आहे. हा चित्रपट चित्रपटगृहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील दाखवला जाऊ नये, अशी मागणी आम्ही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही पत्राद्वारे ही विनंती करत आहोत. ''असं सुरेश गुप्ता म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in