Boys 4: 'बॉईज 4' घेऊन आलाय दिवाळीची खास ऑफर; सिनेरसिकांना खास संधी

Boys 4: 'बॉईज 4' घेऊन आलाय दिवाळीची खास ऑफर; सिनेरसिकांना खास संधी

बॉईज 4' ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर तब्बल ४.२० कोटीची कमाई केली आहे.

'बॉईज 4' चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकवर्ग खूप आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत होते. या चित्रपटाचे याआधीचे तिनही भाग यशस्वी झाले आहेत. त्यामुळे 'बॉईज 4' हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. अशातच आता अजून एक खास ऑफर प्रेक्षकांना मिळणार आहे. 'बॉईज 4' चित्रपटाची दिवाळीनिमित्त खास ऑफर सुरु आहे.

'बॉईज 4' चित्रपटाने दिवाळीनिमित्त प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. दिवाळी स्पेशल ऑफर! एजॉय करा बॉईज-4 आता फक्त रु ९९/ - मध्ये... अशी घोषणा करत 'बॉईज 4' चित्रपट प्रेक्षकांना फक्त ९९ रुपयात बघायला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी 'बॉईज 4' हा चित्रपट पाहिला नाही. त्यांच्यासाठी चित्रपट ९९ रुपयात बघायची ही खास संधी आहे.

'बॉईज 4' ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर तब्बल ४.२० कोटीची कमाई केली आहे. बॉक्स ऑफीसवरील ही कमाई बघता 'बॉईज 4' हा चित्रपट लोकांना आवडत असून सुपरहिट झालाय असं म्हणायला हरकत नाही. 'बॉईज 4' या चित्रपटांत सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासह ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे हे कलाकारांच्या देखील भूमिका आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in