मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत यांची भूमिका असलेला इमर्जन्सी चित्रपटात सुचविण्यात आलेली काही सीन्स जर निर्मात्यांनी चित्रपटामधून काढून टाकले तर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सेंसॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र दिले जाईल, असे सेंसॉर बोर्डाने उच्च न्यायालयाला सांगितले.
न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला आणि न्या. फिरदोस पुनीवाला यांनी चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी सेंसॉर बोर्डाला २५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. याबाबत सुनावणी दरम्यान सेंसॉर बोर्डाने न्यायालयाला सांगितले की, बोर्डाच्या पुन:आढावा समितीने चित्रपटातील काही सीन्स काढण्याची सूचना केली आहे. जर निर्मात्यांनी हे सीन्स चित्रपटातून काढून टाकले तर चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सेंसॉर बोर्डाने घेतला आहे.
सीन्स कापता येतील की नाही, याबाबत निर्णय घेण्यासाठी निर्मात्यांनी न्यायालयाकडून वेळ मागून घेतला आहे.