छोट्या पडद्यावरदेखील 'चंद्रयान 3' ला सलामी

अभिनेत्री मौशमी चटर्जी यांनी केलं कौतुक
छोट्या पडद्यावरदेखील 'चंद्रयान 3' ला सलामी

काहीच दिवसांपूर्वी भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेचं इस्त्रोची चंद्रयान ३ मोहीम फत्ते झाली आणि चंद्रयान ३ चं चंद्रावरील सॉफ्ट लँडिंग यशस्वी झालं. या कामगिरीचं जगभरात कौतुक होताना दिसत आहे. छोट्या पडद्यावरदेखील रिऍलिटी शोमध्ये मुलांनी चंद्रयान ३ मोहिमेला सलामी दिली आहे.

इंडियाज बेस्ट डान्सर 3 या कार्यक्रमात विपुल खंडपाल आणि समर्पण लामा यांनी कोरिओग्राफर पंकज थापासोबतच्या परफॉर्मन्समधून ISRO ला आणि चंद्रयान 3 मोहिमेला आदरांजली वाहिली आहे. या परफॉर्मन्समध्ये त्यांनी वैज्ञानिकांचा संघर्ष आणि आपल्या कामातील अढळ निष्ठा दाखवून त्यांच्यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पाहिला देश कसा ठरला हे दाखवले. ‘83’ चित्रपटातील ‘लहरा दो’ आणि ‘ब्रदर्स’ चित्रपटातील ‘सपना जहां’ या गाण्यांवर त्यांनी सादर केलेल्या डान्सने परीक्षक भावुक झाले .

ज्येष्ठ अभिनेत्री मौशमी चटर्जी देखील या कार्यक्रमात होत्या त्या म्हणाल्या, “चंद्रयान मोहिमेतून आपण हाच धडा शिकलो की आशा कधी सोडू नये. यान लँड होताना मनावर कसा ताण होता, हे मला आठवते आहे. मी माझ्या घरकामाच्या बाईला देखील बजावून ठेवले होते की चंद्रयान लँड होईपर्यंत मध्येच व्यत्यय आणू नकोस. ती भावना व्यक्त करायला माझ्यापाशी शब्दच नाहीत. भारतीय असल्याचा मला अभिमान वाटतो!”

टेरेन्स लुईस आपल्या भावना आवरू शकला नाही. तिन्ही कलाकारांचे कौतुक करताना तो म्हणाला, “अप्रतिम अॅक्ट! हा अप्रतिम अॅक्ट कोरिओग्राफ करणारे तुम्ही तिघेही धन्य आहात. पंकज, विपुल, समर्पण तुम्ही आज आपल्या डान्समधून आम्हाला तो गर्वाचा अनुभव दिलात. तुमच्या परफॉर्मन्स मध्ये कमालीची भावनिक खोली होती. तुमच्या डान्सिंगचा दर्जा, पॅशन आणि विविध रचनांमधून तुम्ही वैज्ञानिकांची मनोवृत्ती ज्या रीतीने सादर केलीत, त्याला सलाम! हा अॅक्ट केवळ अप्रतिम नव्हता तर इतिहास घडवणारा होता.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in