IC 814 The Kandahar Hijack: सरकारच्या दबावानंतर ‘नेटफ्लिक्स’चा बदल

‘आयसी-८१४ : द कंधार हायजॅक’ सीरिजमध्ये विमानाचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांची खरी नावे व सांकेतिक नावे या सीरिजच्या ‘डिस्क्लेमर’मध्ये देण्यात येणार आहेत.
IC 814 The Kandahar Hijack: सरकारच्या दबावानंतर ‘नेटफ्लिक्स’चा बदल
YouTube
Published on

नवी दिल्ली : ‘आयसी-८१४ : द कंधार हायजॅक’ सीरिजमध्ये विमानाचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांची खरी नावे व सांकेतिक नावे या सीरिजच्या ‘डिस्क्लेमर’मध्ये देण्यात येणार आहेत. नेटफ्लिक्सवर आलेल्या या सीरिजवरून सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होत आहे. कारण या अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांची नावे बदलून हिंदू ठेवली आहेत.

IC 814 The Kandahar Hijack: सरकारच्या दबावानंतर ‘नेटफ्लिक्स’चा बदल
'कंदहार हायजॅक' सिरीज वादात, सरकारने Netflix च्या कंटेंट हेडला बजावले समन्स, दहशतवाद्यांच्या नावांमुळे संताप

‘नेटफ्लिक्स’ने मंगळवारी ‘आयसी-८१४-द कंदाहार हायजॅक’ या सीरिजवरून सुरू असलेला वाद शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले. या सीरिजमध्ये ‘डिस्क्लोजर’मध्ये दहशतवाद्यांची खरी नावे जोडली आहेत. तसेच हे दहशतवादी एका-दुसऱ्याशी बोलताना ‘सांकेतिक’ नावाने हाक मारत होते. तीही नावे जाहीर केली जातील, असे ‘नेटफ्लिक्स’ने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in