मुंबई : 'सीआयडी' आणि 'आहट'सारख्या लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बी. पी. सिंह यांचे निधन झाले आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची माहिती शेअर करत दुःख व्यक्त केले.
बी. पी. सिंह यांचा मध्यरात्री झोपेतच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्या निधनाची माहिती कळताच ‘सीआयडी’च्या संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला. त्यांच्यावर बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.