कंगनाच्या श्रीमुखात भडकावणारी महिला कॉन्स्टेबल निलंबित

भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत या दिल्लीला रवाना होत असताना सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलने चंडिगड विमानतळावर त्यांच्या श्रीमुखात भडकावल्याची घटना गुरुवारी घडली. या महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले असून तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
कंगनाच्या श्रीमुखात भडकावणारी महिला कॉन्स्टेबल निलंबित
X

चंडिगड : भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत या दिल्लीला रवाना होत असताना सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलने चंडिगड विमानतळावर त्यांच्या श्रीमुखात भडकावल्याची घटना गुरुवारी घडली. या महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले असून तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

कंगना राणावत यांची विमानतळावर तपासणी करताना महिला कॉन्स्टेबलने त्यांच्या श्रीमुखात भडकावली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी कंगना यांनी खलिस्तानबाबत भाष्य केले होते, म्हणून कदाचित त्यांच्या श्रीमुखात भडकावण्यात आली असावी, असे कंगना यांच्या एका सहकाऱ्याने म्हटले आहे.

पंजाबमध्ये दहशतवाद, हिंसाचाराची परिसीमा

पंजाबमध्ये दहशतवाद आणि हिंसाचार पराकोटीला पोहोचला आहे, असे राणावत यांनी एक्सवर म्हटले आहे. सदर महिला कॉन्स्टेबल एका बाजूने आपल्याजवळ आली आणि तिने आपल्याला मारहाण करून शिवीगाळ केली, याबाबत आपण जाब विचारला, तेव्हा तिने आपला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले, असे राणावत म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in