Club 52 Teaser: हार्दिक जोशी - भाऊ कदम यांच्या 'क्लब 52' चित्रपटाचा टिझर रिलीझ; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

'क्लब 52' या चित्रपटाला 'एक डाव नियतीचा' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे
Club 52 Teaser: हार्दिक जोशी - भाऊ कदम यांच्या  'क्लब 52' चित्रपटाचा टिझर रिलीझ; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

मराठी चित्रपटसृष्टीत एकामागोमाग एक भन्नाट चित्रपट येतंच आहेत. त्यातच आता 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतला राणादा म्हणजेच मराठमोळा अभिनेता हार्दिक जोशीच्या नवीन चित्रपटाची सर्वांना फार उत्सुकता लागून आहे. 'क्लब 52' असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटांत सिनेरसिकांना दमदार स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. 'क्लब 52' या चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

या चित्रपटाचा विषय खूपच आगळावेगळा असून त्याचा टीझर भन्नाट असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून देण्यात येत आहेत. हार्दिकसोबत या चित्रपटात भाऊ कदम देखील झळकणार आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'क्लब 52' या सिनेमाची निर्मिती आणि प्रस्तुती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. तर अमित कोळी यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शिनाची धुरा सांभाळली आहे.

'क्लब 52' या चित्रपटाला एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. टीजरवरून या चित्रपटांत पत्त्यांचा डाव आणि त्याच्याशी संबंधित कथानक असल्याचा अंदाज बांधला जात आहे. बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन केलं आहे. तर , करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन केलं आहे.

'क्लब 52' या चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे. अ‍ॅक्शनपॅक्ड टीजरमुळे कथानकाविषयीची उत्सुकता फारच वाढली आहे. येणाऱ्या १५ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in