हास्यकलाकार राकेश बेदींना ऑनलाईन गंडा

व्यक्तीकडून फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच राकेश बेदी यांनी ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
हास्यकलाकार राकेश बेदींना ऑनलाईन गंडा

मुंबई : अनेक हिंदी चित्रपटांतून हास्यकलाकार म्हणून नावारूपाला आलेले अभिनेता राकेश बेदी यांना अज्ञात सायबर ठगाने सुमारे ८५ हजारांना गंडा घातला. पुण्याच्या फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करून ही फसवणूक झाली असून, त्यांच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी फसवुणकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. राकेश मदनगोपाल बेदी (६९) हे हास्यकलाकार असून, त्यांच्या मालकीचे पुण्यातील कोंडवा, वनावडी, साळुंखे विहार रोडवर ग्रीन एकर्समध्ये दोन फ्लॅट आहेत. या फ्लॅटमध्ये सध्या कोणीच राहत नसून, त्यांना फ्लॅटची विक्री करायची होती. त्यामुळे त्यांनी नो ब्रोकर ॲपवर फ्लॅट विक्रीची जाहिरात दिली होती. सोमवारी २५ डिसेंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना आदित्य कपूर नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला होता. या व्यक्तीकडून फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच राकेश बेदी यांनी ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in