'ड्रीम गर्ल 2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच ; तिसऱ्या दिवशी केली तब्बल 'एवढी' कमाई

'गदर 2' आणि 'OMG-2'या चित्रपटांना आयुष्मानचा 'ड्रीम गर्ल 2' हा सिनेमा चांगलीच टक्कर देताना दिसत आहे.
 'ड्रीम गर्ल 2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच ; तिसऱ्या दिवशी केली तब्बल 'एवढी' कमाई

अभिनेता आयुष्यमान खुराणाचा 'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट २५ ऑगस्टला चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी थियटर हाऊसफुल केलं आहे. तीन दिवसात या सिनेमाने तुफान कमाई केली आहे. 'गदर 2' आणि 'OMG-2'या चित्रपटांना आयुष्मानचा 'ड्रीम गर्ल 2' हा सिनेमा चांगलीच टक्कर देताना दिसत आहे.

कॉमेडी-ड्रामा असलेल्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग करत चांगली कमाई केली आहे. विकेडपर्यंत या सिनेमाने आपल्या बजेच्या वर कमाई केली आहे. 'ड्रीम गर्ल 2' या सिनेमाने तीन दिवसात 40 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण 10.69 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 14.02 कोटींच्या आसपास कमाई केली होती. तर 'Sanlik.com'च्या रिपोर्टनुसार, 'ड्रीम गर्ल 2' ने रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करत 16 कोटींचा गल्ला जमावला आहे. हा सिनेमाने फक्त ३५ कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.

राज शांडिल्य दिग्दर्शित हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'ड्रीम गर्ल' चा सिक्वेल असून .या चित्रपटात आयुष्मान-अनन्यासह , परेश रावल, अनु कपूर, विजय राज, राजपाल यादव आणि अभिषेक बॅनर्जी असे दिग्गज कलाकार मनोरंजन करत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in