‘रामसेतू’वरून वाद निर्माण; अक्षय कुमारला अटक करून त्याला देशातून हद्दपार करा-सुब्रमण्यम स्वामी

स्वामी यांनी चित्रपटाचे निर्माते व अक्षय कुमार यांच्याविरोधात खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
‘रामसेतू’वरून वाद निर्माण; अक्षय कुमारला  अटक करून त्याला देशातून हद्दपार करा-सुब्रमण्यम स्वामी

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारची येऊ घातलेला चित्रपट ‘रामसेतू’वरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात अनेक चुकीच्या बाबी दाखवल्या जात आहेत. अक्षय कुमार हा परदेशी नागरिक असून या प्रकरणी त्याला अटक करून त्याला देशातून हद्दपार करावे, अशी मागणी राजकीय नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

स्वामी यांनी चित्रपटाचे निर्माते व अक्षय कुमार यांच्याविरोधात खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या चित्रपटात ‘रामसेतू’ला चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. त्यामुळे ‘रामसेतू’च्या प्रतिमेला धक्का बसला आहे. माझे वकील सत्य सभरवाल यांनी खटल्याची तयारी केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ‘रामसेतू’च्या पोस्टरमध्ये एका गुफेच्या बाहेर अक्षय कुमार उभा आहे. हातात मशाल घेऊन तो काही तरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस असून तिच्या हातात टॉर्च आहे. या पोस्टरवरून सोशल मीडियावर अक्षय कुमारवर जोरदार टीका होत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in