राजपालला पुन्हा एकदा कोर्टाची नोटीस

राजपाल यादवने आपल्या मुलाला बॉलिवूडमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी सुरिंदरकडून 20 लाख रुपये घेतले होते. पण राजपालनी सुरिंदरच्या मुलाला बॉलिवूडमध्ये काम करू दिले नाही.
राजपालला पुन्हा एकदा कोर्टाची नोटीस
ANI
Published on

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव नेहमीच आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकतो. राजपाल यादव चित्रपटातील त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता राजपाल वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. राजपाल यादववर 20 लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप लागला आहे. त्यामुळे त्याला इंदूर पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

वृत्तानुसार, एका बिल्डरने राजपाल यादववर २० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. सुरिंदर नावाच्या बिल्डरने त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. सुरिंदरने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राजपाल यादवने आपल्या मुलाला बॉलिवूडमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी सुरिंदरकडून 20 लाख रुपये घेतले होते. पण राजपालनी सुरिंदरच्या मुलाला बॉलिवूडमध्ये काम करू दिले नाही आणि त्यानंतर राजपाल यादव याने सुरिंदरचे फोन घेणे बंद केले. सुरिंदर म्हणाले, "राजपाल यादवने फोन न उचलल्याने निराश होऊन त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली."

याआधी सुद्धा राजपाल यादवला ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राजपाल यादवचा 'भूल भुलैया-2' हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार हिट ठरला होता. राजपालने हंगामा, रेस अगेन्स्ट टाइम, चुप चुप के, गरम मसाला, फिर हेरा फेरी, ढोल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in