जिवंत पूनम पांडेवर टीकेचा भडीमार

आपल्या मृत्यूची खोटी बातमी दिल्याप्रकरणी सोशल मीडियातून पूनम पांडेवर टीकेचा भडीमार होत आहे.
जिवंत पूनम पांडेवर टीकेचा भडीमार

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) निधन झाल्याची माहिती शुक्रवारी तिच्या टीमने दिली; मात्र, ती पूर्ण अफवा होती. मी जिवंत आहे. मी सर्वांची माफी मागते, असे तिने म्हटले आहे. तिने आपल्या मृत्यूची खोटी बातमी दिल्याप्रकरणी सोशल मीडियातून तिच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.

पूनमने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. “मी जिवंत आहे, कर्करोगामुळे माझा मृत्यू झालेला नाही.” सुदैवाने सर्व्हायकल कॅन्सरमुळे माझे निधन झालेले नाही. पण, आज देशातील हजारो महिलांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. कित्येक महिलांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. या गंभीर आजाराचा सामना कसा करायचा याबद्दल पुरेशी जनजागृती महिलावर्गात झालेली नाही. सर्व्हायकल कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी तुम्हाला वेळच्या वेळी आरोग्य तपासणी व एचपीव्ही लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. आपण एकत्र मिळून या आजाराबाबत जनजागृती करूया. ही बातमी पैशांसाठी नव्हे, तर जागृतीसाठी पसरवली, असे तिने व्हिडीओत सांगितले. दरम्यान, स्वत:च्या निधनाची खोटी माहिती शेअर केल्यामुळे सध्या पूनम पांडेविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

logo
marathi.freepressjournal.in