दादा कोंडकेंच्या १२ चित्रपटांच्या हक्कांचा वाद हायकोर्टात

न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हे आदेश देताना एव्हरेस्ट एंटरटेनमेंटला अंतरिम दिलासा दिला
दादा कोंडकेंच्या १२ चित्रपटांच्या हक्कांचा वाद हायकोर्टात

चित्रपट अभिनेते-निर्माते दिवंगत दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांच्या कॉपीराईटसह संबंधित इतर सर्व हक्क पुढील आदेशापर्यंत 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दादा कोंडके यांच्या ट्रस्टला दिले. चित्रपटांच्या हक्कांवर दावा करीत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हे आदेश देताना एव्हरेस्ट एंटरटेनमेंटला अंतरिम दिलासा दिला.

दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांच्या हक्कांसदर्भात एव्हरेस्ट एंटरटेनमेंट लिमिटेडने दादा कोंडके यांच्या नावाने असलेल्या शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान या ट्रस्टविरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमोर सुनावणी झाली.

logo
marathi.freepressjournal.in