अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

गँगस्टर गोल्डी ब्रार याने पुन्हा एकदा सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे
अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूडचा भाईजान असणाऱ्या सलमान खान याला जीवे मारण्याची धमकीचे सत्र सुरुच आहे. कॅनडातील वाँटेड गँगस्टर गोल्डी ब्रार याने पुन्हा एकदा सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याने एका मुलाखती दरम्यान ही धमकी दिली आहे. सलमान खान त्याच्या हिटलिस्टमध्ये असल्याचं त्याने यावेळी म्हटलं आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणी वाँटेड गोल्डीने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा दावा केला आहे.

गोल्डी याने सलमान खाल याला जीवे मारण्याची धमकी देण्यीची ही पहिली वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी देखील गोल्डी ब्रारकडून जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आल्याची माहिती अभिनेत्याने मुंबई पोलिसांना दिली होती. हिंदू गितेला, शीख गुरु ग्रंथाला पवित्र मानतात त्या प्रकारे बिश्नोई समाज काळवीटाला पवित्र मानतो. सलमान खान याने काळवीटाची शिकार केली. त्याने बिश्नोई समाजाचा अपमान केला. असं गोल्डी याने सांगितलं आहे. यावेळी त्याने जोपर्यंत सलमान खान माफी मागत नाही. तोपर्यंत प्रयत्न करत राहू असं देखील सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in