'डिलिव्हरी बॉय' हे नाव ऐकले की, डोळ्यांसमोर येतो तो घरी येऊन सामान देणारी ‘डिलिव्हरी बॉय’. मात्र सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे, ते सोशल मीडियावर झळकलेल्या ‘डिलिव्हरी बॅाय’ने. एका बॅाक्समध्ये छोटे बाळ दिसत आहे. आता हे बॅाक्समधील बाळ आणि डिलिव्हरी बॅायचा नेमका संबंध काय, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस निर्मित, सिनेपोलिस सिनेमा प्रस्तुत, मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे दीपा नायक प्रस्तुतकर्ता आहेत तर डेव्हिड नादर निर्माते आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, " 'डिलिव्हरी बॉय' हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. हसत हसत सामाजिक संदेश देणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाचे नाव ‘डिलिव्हरी बॅाय’ का आहे, याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.’’