देवमाणूस फेम 'नाम्या' एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला ; Tiny Talkies चं पहिलंवहिलं गाणं करणार प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य

गुरुवारी कल्याणमधील प्रसिद्ध बुक मार्क कॅफे येथे या गाण्याच्या टीझरचे अनावरण आणि उपस्थित मंडळींना गाण्याची खास झलक दाखवण्यात आली
देवमाणूस फेम 'नाम्या' एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला ; Tiny Talkies चं पहिलंवहिलं गाणं करणार प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य
Published on

प्रेम म्हटलं की प्रेमाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आणि स्पेशल असते असे म्हणायला हरकत नाही. कोणीच कोणाच्या प्रेमाची तुलना एकमेकांच्या प्रेमाशी करू शकत नाही. असंच एका वेगळ्या प्रेमाची गोष्ट गाण्याच्या स्वरूपात मांडत Tiny Talkies प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. गुरुवारी कल्याणमधील प्रसिद्ध बुक मार्क कॅफे येथे या गाण्याच्या टीझरचे अनावरण आणि उपस्थित मंडळींना गाण्याची खास झलक दाखवण्यात आली. येत्या ८ जुलै २०२३ ला हे गाणं प्रेक्षकांना Tiny Talkies च्या युट्युब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. जनार्दन धात्रक याच्या सुरेल आवाजातील हे गाणे ऐकणाऱ्याच्या ओठी लगेच बसले. या गाण्यासोबतच या प्रोजेक्टच्या ६ वर्षाच्या मेकिंग प्रोसेसचा प्रवास ऐकताना उपस्थित मंडळींचे डोळे पाणावले.

अभिजित पवार या ध्येयवेड्या गीतकाराच्या ओळी प्रेक्षकांना प्रेमाची व्याख्या सोपी करण्यास मदत करतात. शब्दांना सुमधुर संगीतबद्ध करण्याचे काम सुखदा भावे -दाबके आणि भाग्येश पाटील यांनी केले.  या गाण्याचे दिग्दर्शन देखील अभिजीतनेच केले आहे. त्याला सिद्धेश नलावडे याने सह-दिग्दर्शक म्हणून मदत केली. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या रामदास पठार , वरंध येथील निसर्गाचे चित्रण करण्यात सिनेमॅटोग्राफर साजन पाटील याने कसलीच कमी ठेवली नाही. साजनच्या कामाला पुरेपूर न्याय देण्याचे काम संकलक आकाश आरगडे यांनी केले. देवमाणूस फेम निलेश गवारे या गाण्यात आपल्या भाबड्या चेहऱ्याचा व अभिनय कौशल्याचा पुरेपूर वापर करताना दिसतो. अभिनेत्री सावली घुले हिने आपल्या निरागसतेने प्रेमाची व्याख्या सोपी करण्यास कमाल मदत केली. वेशभूषेची जबाबदारी भक्ती शिर्के आणि चिन्मयी जोगळेकरने पार पाडली. रोशन गोर्डेचे सुरेख पोस्टर्स लोकांना गाण्याची दखल घेण्यास भाग पाडतात. निर्माते विजय शिंदे यांनी आपल्या टीमला सर्व प्रकारच्या प्रयोगाची मुभा दिल्यानेच हा सुंदर अल्बम बनू शकला असे टीमने सांगितले.     

logo
marathi.freepressjournal.in