धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या गाडीला अपघात

सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या गाडीला अपघात

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते अपघातात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अभिनेते, निर्माते रविवारी सकाळी नवी मुंबईत अपघात झाला आहे.

मंगेश देसाई हे कुटुंबासोबत कर्जत इथे जात असताना नवी मुंबईतील कोकण भवनजवळ हा अपघात घडला आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर मंगेश देसाई गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त त्यांनी अनेक दौरे केले. गेले काही दिवस सतत व्यग्र वेळापत्रक असल्याने आता कुटुंबियांसोबत काही वेळ घालवण्यासाठी ते कर्जला निघाले होते. नवी मुंबईतील कोकण भवनसमोरील पुलावर हा अपघात घडला असून गाडीतील सर्वजण सुखरुप असल्याचेही मंगेश देसाईंनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in