तुमची आठवण येतेय बाबा... दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या जन्मदिनी सनी–ईशाची भावनिक पोस्ट

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदी सिनेविश्वातील ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकमग्न झाली होती. ते ८९ वर्षांचे होते. आज (दि.८) त्यांचा ९० वा वाढदिवस आहे.
तुमची आठवण येतेय बाबा... दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या जन्मदिनी सनी–ईशाची भावनिक पोस्ट
तुमची आठवण येतेय बाबा... दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या जन्मदिनी सनी–ईशाची भावनिक पोस्ट
Published on

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदी सिनेविश्वातील ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकमग्न झाली होती. ते ८९ वर्षांचे होते. आज (दि.८) त्यांचा ९० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने, मुलगी ईशा देओलने वडील धर्मेंद्र यांच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली. ईशानंतर, सनी देओलनेही धर्मेंद्र यांचा कधीही न पाहिलेला एक व्हिडीओ शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली.

सनी देओलची हृदयस्पर्शी आठवण

सनी देओलने इंस्टाग्रामवर त्याचे दिवंगत वडील आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा एक खास व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओसोबत सनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे. बाबा नेहमीच माझ्यासोबत आहेत, माझ्या मनात आहेत. लव्ह यू बाबा, मिस यू."

धर्मेंद्र यांचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ...

सनी देओलने इंस्टाग्रामवर धर्मेंद्र यांचा कधीही न पाहिलेला एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र काळी टोपी घालून शांत वातावरणात उभे आहेत. मागे डोंगर आणि हिरवी झाडे दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सनी धर्मेंद्र यांना विचारतो की, "बाबा, तुम्ही मजा करत आहात ना?" यावर, धर्मेंद्र क्षणभर हसतात आणि आपल्या शैलीत उत्तर देतात, "हो मी मजा करत आहे , हे खूपच सुंदर आहे."

ईशा देओलची वडिलांसाठी खास पोस्ट

ईशा देओलनेही वडिलांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत तिने एक भावस्पर्शी पोस्ट लिहिली. ईशाने लिहिले की, "माझे प्रिय बाबा... आपलं नातं हे जगातील सर्वात मजबूत बंधन. 'आपण'... प्रत्येक जन्मात, प्रत्येक जगात आणि त्यापलीकडे... आपण नेहमीच एकत्र आहोत. स्वर्ग असो वा धरती, आपण एक आहोत. सध्या मी तुम्हाला माझ्या हृदयात खूप काळजीने आणि खूप प्रेमाने जपून ठेवलं आहे, जेणेकरून तुम्ही आयुष्यभर माझ्यासोबत राहाल."

"तुमच्या जादुई आणि अमूल्य आठवणी, जीवनाचे धडे, तुमच्या शिकवणी, तुमचं मार्गदर्शन, तुमची ऊब, तुमचं निःशर्त प्रेम, प्रतिष्ठा आणि ताकद जी तुम्ही मला तुमची मुलगी म्हणून दिली आहे, कोणीही त्याची जागा घेऊ शकत नाही किंवा त्याची बरोबरी करू शकत नाही."

"मला तुमची खूप आठवण येते बाबा, तुमची उबदार, संरक्षणात्मक मिठी जी सर्वात आरामदायी ब्लँकेटसारखी वाटायची. तुमचे कोमल तरीही मजबूत हात जे न बोलताही इतकं काही सांगायचे आणि माझं नाव घेऊन मला हाक मारणारा तुमचा आवाज आणि मनसोक्त गप्पा, हास्य आणि शायरी...'नेहमी नम्र, आनंदी, निरोगी आणि मजबूत रहा.' हे तुमचे ब्रीदवाक्य होते. मी तुमचा वारसा अभिमानाने आणि आदराने पुढे नेण्याचे वचन देते. मी तुमचे प्रेम लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे तुमच्यावर माझ्याइतकेच प्रेम करतात. आय लव्ह यू , बाबा. तुमची लाडकी मुलगी, तुमची ईशा, तुमची बिट्टू."

हा सिनेमा ठरला शेवटचा

अभिनेते धर्मेंद्र हे आजारांमुळे त्रस्त होते. १० नोव्हेंबर रोजी श्वसनाचा त्रास झाल्यानंतर त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १२ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र काही दिवसांतच त्यांचे निधन झाले. धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा "इक्कीस" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in