‘धुरंदर’ सिनेमा ठरला कमाईतही ‘धुरंदर’; ८३१ कोटींचा निव्वळ नफा कमवला

दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर’ हा चित्रपट देशभरात ८३१ कोटी रुपयांहून अधिक नेट कमाई करत आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे, अशी माहिती निर्मात्यांनी बुधवारी दिली.
‘धुरंदर’ सिनेमा ठरला कमाईतही ‘धुरंदर’
‘धुरंदर’ सिनेमा ठरला कमाईतही ‘धुरंदर’Photo : Social Media
Published on

मुंबई : दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर’ हा चित्रपट देशभरात ८३१ कोटी रुपयांहून अधिक नेट कमाई करत आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे, अशी माहिती निर्मात्यांनी बुधवारी दिली. मंगळवारी ( ३३व्या दिवशी) चित्रपटाने ५.७० कोटी रुपयांची नेट कमाई केल्यानंतर निव्वळ कमाई ८३१.४० कोटी रुपयांवर पोहोचली असून त्यामुळे तो आजपर्यंतच्या सर्व हिंदी चित्रपटांमध्ये अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे.

या आधी हा विक्रम अल्लू अर्जुनच्या २०२३ मधील ब्लॉकबस्टर ‘पुष्पा २ : द रुल’च्या हिंदी आवृत्तीच्या नावावर होता, ज्याने हिंदीत ८३० कोटी रुपयांची कमाई केली होती इतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये शाहरुख खानचा ‘जवान’ (६४३ कोटी रुपये) आणि हॉरर-कॉमेडी ‘स्त्री २’ (६२७ कोटी रुपये) यांचा समावेश आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील यशराज फिल्म्सने ‘धुरंधर’च्या यशाबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. एका गुप्तहेरावर आधारलेली या चित्रपटाची कथा आणि त्यातील संगीताच्या ठेक्यावरील गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

जगभरात १२२० कोटींची कमाई

जागतिक स्तरावर ‘धुरंधर’ने १२२० कोटी रुपयांहून अधिक ग्रॉस कमाई केली आहे. उद्योग ट्रॅकर सॅकनिल्कनुसार हा चित्रपट सध्या एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ (१२३० कोटी), ‘पुष्पा २’ (१७४२ कोटी), ‘बाहुबली २: द कन्क्लूजन’ (१७८८ कोटी) आणि आमीर खानच्या ‘दंगल’ (२०७० कोटी) यांच्यामागे आहे.

एकाच भाषेत सर्वाधिक कमाई धुरंधर हा केवळ एक चित्रपट नाही, तर भारतीय सिनेमातील एक ऐतिहासिक टप्पा आहे, जो कायम लक्षात राहील. एकाच भाषेत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरल्याबद्दल आदित्य धर आणि जिओ स्टुडिओजचे अभिनंदन.

यशराज फिल्म्स

अशी आहे चित्रपटाची कमाई

भारताच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईचे तपशील पाहता चित्रपटाने सलग आठवड्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या आठवड्यात २१८ कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात २६१.५० कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात १८९.३० कोटी रुपये आणि चौथ्या आठवड्यात ११५.७० कोटी रुपयांची कमाई झाली. पाचव्या आठवड्याच्या सप्ताहअखेर चित्रपटाने आणखी ३५.८० कोटी रुपयांची भर घातली असून आठवड्याच्या दिवशीही स्थिर कमाई सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in