दिग्दर्शक कुमार शहानी यांचे निधन

वशिष्ठ यांनी वार वार वारी ख्याल गाथा, कसबा या शहानी दिग्दर्शित चित्रपटांमध्ये काम केले होते.
दिग्दर्शक कुमार शहानी यांचे निधन
Published on

कोलकाता : ‘माया दर्पण’, ‘चार अध्याय’ आणि ‘कसबा’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे समांतर चित्रपटसृष्टीतील आयकॉन चित्रपट निर्माते कुमार शहानी यांचे कोलकाता येथील एका रुग्णालयात शनिवारी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निकटवर्ती स्नेही अभिनेत्री मीता वशिष्ठ यांनी ही माहिती दिली.

त्यांच्या पश्चात पत्नी व दोन कन्या असा परिवार आहे. शहानी यांचे निधन हे एक मोठे वैयक्तिक नुकसान आहे, असे वशिष्ठ यांनी सांगितले. वशिष्ठ यांनी वार वार वारी ख्याल गाथा, कसबा या शहानी दिग्दर्शित चित्रपटांमध्ये काम केले होते. शहानी यांचा जन्म फाळणीपूर्व भारतात सिंध प्रांतातील लारकाना येथे झाला. १९४७ मध्ये फाळणीनंतर शहानी यांचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. मणि कौल यांच्यासोबत त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिक्षण घेतले. शहानी यांनी १९७२ मध्ये ‘माया दर्पण’द्वारे पदार्पण केले. हिंदी लेखक निर्मल वर्मा यांच्या लघुकथेवर आधारित हा चित्रपट एका स्त्रीभोवती फिरतो. तिचा प्रियकर आणि भारतात जमीनदारीच्या काळामध्ये तिच्या वडिलांच्या सन्मानाचे रक्षण करतो. १९८४ मध्ये त्यांनी ‘तरंग’ या चित्रपटाचा पाठपुरावा केला.

logo
marathi.freepressjournal.in