नाना सरांशिवाय 'त्या' चित्रपटाची कल्पनाच शक्य नाही; दिग्दर्शक समृद्धी पोरे यांनी व्यक्त केल्या भावना

Nana Patekar Passes Away : मृत्यूच्या क्षणी माणूस शेवटी एकटाच असतो, हे कटू सत्य या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
नाना सरांशिवाय 'त्या' चित्रपटाची कल्पनाच शक्य नाही; दिग्दर्शक समृद्धी पोरे यांनी व्यक्त केल्या भावना
नाना सरांशिवाय 'त्या' चित्रपटाची कल्पनाच शक्य नाही; दिग्दर्शक समृद्धी पोरे यांनी व्यक्त केल्या भावना
Published on: 

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजल्यापासून मन सुन्न झाले आहे. काल रात्री अडीच वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित होते. मात्र, अचानक छातीत दुखू लागल्याने गोव्यातील त्यांच्या अत्यंत आवडत्या ठिकाणी त्यांचे निधन झाले. सर्वांत वेदनादायी बाब म्हणजे त्या वेळी त्यांच्या जवळ कोणीही नव्हते. ही बातमी कळेपर्यंत ते जगाचा निरोप घेऊन गेले होते. मृत्यूच्या क्षणी माणूस शेवटी एकटाच असतो, हे कटू सत्य या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

नाना पाटेकर हे आपल्या आरोग्याबाबत अत्यंत जागरूक होते. ते डायट आणि फिटनेसबाबत कमालीचे काटेकोर होते. आपल्या आरोग्याची आणि फिटनेसची ते नेहमीच काळजी घेत असत. त्यामुळे इतके नियम पाळणाऱ्या, स्वतःला तंदुरुस्त ठेवणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे अचानक मृत्यू होणे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याचे समृद्धी पोरे यांनी सांगितले.

नाना पाटेकर शूटिंगच्या निमित्ताने सतत प्रवास करत असले तरी त्यांच्या आवडत्या ठिकाणी आयुष्याचा शेवट झाला, हीच या दुःखद घटनेतील एकमेव जमेची बाजू म्हणता येईल. मात्र, त्यांचे अचानक जाणे ही कल्पनाही अत्यंत वेदनादायी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातील बाबा आमटे यांची भूमिका नाना पाटेकर यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची होती. त्या भूमिकेमुळे त्यांना स्वतःबद्दल एक वेगळाच कृतार्थ भाव वाटत होता. या भूमिकेशी त्यांचे विशेष भावनिक नाते निर्माण झाले होते.

दरम्यान, त्यांच्या आगामी चित्रपटाचा हिंदी रिमेकही येणार होता. या प्रकल्पाचे काम सुरळीत सुरू असताना अचानक नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी आली आणि सर्व काही अक्षरशः कोलमडून पडले. नाना सरांशिवाय त्या चित्रपटाची कल्पनाही करणे अशक्य वाटत आहे. त्यामुळे पुढे काय करायचे, हा प्रश्नच सध्या असह्य वाटत असल्याचे समृद्धी पोरे यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in