आलियाने अयोध्येत नेसलेल्या साडीची चर्चा, किंमत किती? पाहा काय आहे खास

आलियाने नेसलेली साडीच्या बॉर्डरवर रामायणातील महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख करण्यात आलेला होता.
आलियाने अयोध्येत नेसलेल्या साडीची चर्चा, किंमत किती? पाहा काय आहे खास

अयोध्येत प्रभु रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याचा अख्खा भारत साक्षीदार झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्यासह संत समाज आणि प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी पूर्ण झाला. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी अनेक बाॅलिवू़ड कलाकारांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. या सोहळ्यात हजेरी लावलेल्या सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. पण यातही नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं ते म्हणजे अभिनेत्री आलिया भट्टने.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलियाने पेहराव केलेली साडी आणि लूकमुळे आलिया चर्चेत आली आहे. आलियाने नेसलेल्या फिकट हिरव्या रंगाच्या साडीची सर्वत्र चर्चा होत आहे. आलियाने नेसलेली सिंपल साडी ही अतिशय खास असून या साडीच्या बॉर्डरवर रामायणातील महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख करण्यात आलेला होता. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आलियाने तिच्या साडीसोबत मॅचिंग शाल कॅरी केली. या साडीत आलिया खूपच सुंदर दिसत होती. आलियासोबतच रणबीरने पारंपरिक लुक केला होता. त्यानं धोती कुर्ता घातला होता. अलियाने नेसलेल्या साडीची किंमत ४५ हजार असल्याचं काही माध्यमांनी म्हटले आहे.

या सोहळ्यात रणबीर आणि आलियासह कतरिना कैफ, विक्की कौशल, कंगना रणौत, माधुरी दीक्षित - श्रीराम नेने, श्लोका आणि आकाश अंबानी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन असे अनेक कलाकार अयोध्येत पोहोचले होते.

logo
marathi.freepressjournal.in