Savi: दिव्या खोसलाच्या 'सावी'च्या धमाकेदार टिझर नंतर 'या' दिवशी होणार ट्रेलर प्रदर्शित!

Divya Khosla: अभिनय देव दिग्दर्शित आणि दिव्या खोसला अभिनीत 'सावी' सिनेमाच्या पोस्टर, टिझर नंतर आता ट्रेलरची चर्चा सुरु झाली आहे.
Savi: दिव्या खोसलाच्या 'सावी'च्या धमाकेदार टिझर नंतर 'या' दिवशी होणार ट्रेलर प्रदर्शित!
Published on

Savi Trailer: अभिनय देव दिग्दर्शित सावी हा चित्रपट लोकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढवत आहे, अलीकडेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेलर रिलीजची तारीख २१ मे जाहीर केली आहे. दिव्या खोसला, हर्षवर्धन राणे आणि अनिल कपूर यांना न पाहिलेल्या अवतारात या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे, जे चित्रपटाच्या कथेत दडलेले रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

डिव्हायडेड ग्रिड पोस्टरमध्ये दिव्या खोसला, हर्षवर्धन राणे दिसत आहेत. या तिघांची ही एक इंटरेस्टिंग फ्रेम आहे. मध्यभागी, हर्षवर्धन राणे तुरुंगात अडकला आहे तर, एका बाजूला दिव्या एका बाजूला आनंदी दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला तिच्या नाकातून रक्त आणि डोळ्यातून पाणी येत आहे. हे पोस्टर फारच गूढ आणि थरारक दिसत आहे. या पोस्टर नंतरच या सिनेमाची चर्चा सुरु झाली. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

मुख्य कलाकार दिव्या खोसला आणि हर्षवर्धन राणे यांची धमाकेदार केमिस्ट्री दाखवणारे टीझरमधील रहस्यमय झलक आणि नुकतेच प्रदर्शित झालेले "हमदम" गाणे यामुळे प्रेक्षकांमध्ये ट्रेलरची उत्सुकता वाढली आहे.

टिझर आणि पोस्टर मधून निर्माण झालेलं जिज्ञासा आता ट्रेलर २१ मे रोजी उलगडेल. त्यामुळे ही संधी गमावू नका. सावी हा सिनेमा ३१ मे रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

logo
marathi.freepressjournal.in