DNEG Animation : डिनेग अ‍ॅनिमेशनने क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून केली फिलीप ग्लुकमनची निवड

अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील प्रसिद्ध डिनेग अ‍ॅनिमेशनने (DNEG Animation) फिलीप ग्लुकमन यांची भारतातील क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून केली घोषणा
DNEG Animation : डिनेग अ‍ॅनिमेशनने क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून केली फिलीप ग्लुकमनची निवड

डिनेग (DNEG Animation) हा चित्रपट, टेलिव्हिजन आणि मल्टीप्लॅटफॉर्म सामग्रीच्या निर्मितीसाठी एक अग्रगण्य व्हिज्युअल इफेक्ट आणि अ‍ॅनिमेशन स्टुडिओ आहे. डिनेगने आज फिलीप ग्लुकमन (Philippe Gluckman) यांना डिनेग अ‍ॅनिमेशनसाठी 'क्रिएटिव्ह डायरेक्टर – इंडिया' म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली. क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून, ग्लुकमन भारतातील डिनेग अ‍ॅनिमेशन टीम्सच्या क्रिएटिव्ह आउटपुटवर देखरेख करतील. सहयोग, संवाद आणि नवकल्पना सुलभ करतील.

डिनेग अ‍ॅनिमेशनचे अध्यक्ष टॉम जेकॉम्ब म्हणाले, "पुस इन बूट्स आणि राईज ऑफ द गार्डियन्स सारख्या प्रकल्पांवर, ड्रीमवर्क्समध्ये एकत्र असताना फिलीपसोबत काम करताना मला आनंद झाला. ते कामात आणत असलेली प्रतिभा आणि काळजी मी प्रत्यक्ष पाहिली. फिलीपचे गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांच्या टीममधील कलाकारांसाठी कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम अनुभव निर्माण करण्याची त्यांची इच्छा, डिनेग अ‍ॅनिमेशनच्या महत्त्वाकांक्षेशी पूर्णपणे जुळलेली आहे कारण आम्ही भारत आणि त्यापुढील आमच्या विकासाच्या पुढील टप्प्याकडे पाहत आहोत."

ग्लुकमन यांना ड्रीमवर्क्स अ‍ॅनिमेशनमध्ये अँट्झ, श्रेक, मादागास्कर आणि इतर अनेक प्रकल्पांवर व्हिज्युअल इफेक्ट्स पर्यवेक्षक म्हणून १५ वर्षांचा अनुभव आहे. ग्लुकमनने पेंग्विन ऑफ मादागास्कर, पुस इन बूट्स, ट्रॉल्स आणि बॉस बेबी यांसारख्या अ‍ॅनिमेटेड चित्रपटांच्या सर्जनशील आणि तांत्रिक अंमलबजावणीवर देखरेख केली, स्टुडिओची वाढ, व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करताना व्हिज्युअल गुणवत्ता आणि कार्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी घेतली. डिनेग ऍनिमेशन सध्या अन्नपूर्णा पिक्चर्स आणि नेटफ्लिक्ससाठी निमोना, सोनी पिक्चर्ससाठी अल्कॉन एंटरटेनमेंटसह गारफिल्ड आणि लॉकस्मिथ अ‍ॅनिमेशनसाठी दॅट ख्रिसमस या प्रकल्पावर काम करत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in