'डंकी'चा ग्लोबल बॉक्स ऑफिसवर डंका, जमवला तब्बल 'इतक्या' कोटींचा गल्ला

शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाची जागतिक स्तरावर मोठी कमाई
'डंकी'चा ग्लोबल बॉक्स ऑफिसवर डंका, जमवला तब्बल 'इतक्या' कोटींचा गल्ला

शाहरुख खान आणि तापसी पन्नू यांची प्रमुख भूमिका असलेला "डंकी" हा चित्रपट 21 डिसेंबरला प्रदर्शीत झाला होता. "डंकी" ने जागतिक स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. जगभरातून "डंकी" ने एकूण कलेक्शनमध्ये 400 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, निर्माते राजकुमार हिरानी यांनी ही माहीती दिली.

जवान आणि पठाण या चित्रपटांच्या यशानंतर डंकी या सिनेमांला सुरूवातीला कमाईसाठी संघर्ष करावा लागला. मात्र, 12 व्या दिवशी या चित्रपटाने जागतिक स्तरावर 400.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

भारतात "डंकी" या चित्रपटाने पहील्या दिवशी 29.2 कोटीची कमाई केली होती. तर आता हा गल्ला 106 कोटी 43 लाखांवर जाऊन पोहोचला आहे.

जगभरातून डंकीने पहिल्या दिवशी 58 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 45.4 कोटी रुपये कमावले होते.

रेड चिलीज एंटरटेनमेंट, "डंकी" च्या मागे असलेल्या प्रॉडक्शन हाऊसपैकी एक आहे. या संदर्भात रेड चिलीज एंटरटेनमेंट यांनी ट्विट केले, "आमचा बंदा आणि त्याचे उल्लू दे पठ्ठे (मित्र) तुमच्या अविरत प्रेमाने बॉक्स ऑफिसवर नवीन उंची गाठत आहेत..." तसेच त्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत “बॉक्स ऑफिस आनंदाने भरत आहे... ₹ 400.4 कोटी... असा मजकुर लिहीला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in