Dunki Trailer: शाहरुखच्या 'डंकी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

अनेक नेटकऱ्यांनी 'डंकी' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या ट्रेलरचं भरभरून कौतुक केलं आहे.
Dunki Trailer: शाहरुखच्या 'डंकी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
Published on

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'डंकी' या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या ट्रेलरमध्ये ड्रामा, इमोशन्स आणि अॅक्शन पाहायला मिळत आहे. अनेक नेटकऱ्यांनी 'डंकी' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या ट्रेलरचं भरभरून कौतुक केलं आहे.

अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर 'डंकी' चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू शेअर केला आहे. एका नेटकऱ्यानं ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "राजकुमार हिरानी प्रेक्षकांना कधीही निराश करत नाहीत." तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं की, "शाहरुखचा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट येतं आहे. 'डंकी' हा शाहरुखचा या वर्षाचा तिसरा ब्लॉकबस्टर ठरेल" "डंकी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मी निश्चितपणे बोलू शकतो की हा चित्रपट एक उत्कृष्ट 'सिनेमॅटिक मास्टरपीस' असणार आहे. ज्यामुळे लोक हा चित्रपट वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील!", असं ट्वीट देखील एका नेटकऱ्यानं केलं आहे.

शाहरुख खानच्या चाहत्यांचा वर्षाचा शेवट अगदी मनोरंजनाने होणार आहे. कारण 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहात येणार आहे. 'डंकी' या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी आणि विक्रम कोचर यांच्या देखील प्रमुख भूमिका असतील. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'डंकी' या चित्रपटाची निर्मिती JIO स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in