Shahrukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये घुसखोरी; २ जणांविरोधात गुन्हा दाखल

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या 'मन्नत' बंगल्यामध्ये २ व्यक्तींनी घुसखोरी केल्याची घटना समोर आली
Shahrukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये घुसखोरी; २ जणांविरोधात गुन्हा दाखल

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्यामध्ये २ व्यक्तींनी घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. घरी सुरक्षा रक्षक असूनही २ तरुण मन्नतच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचले. काल मध्यरात्री ही घटना घडली असून या २ तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या महतीनुसार, २ मार्चच्या मध्यरात्री २ तरुण हे सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत मन्नतमध्ये दाखल झाले. ते बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचले होते. मात्र, त्यानंतर सुरक्षा रक्षकांची त्यांच्यावर नजर पडली आणि त्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांनी सांगितले की, ते २ तरुण हे गुजरातचे असून शाहरुख खानचे मोठे चाहते आहेत. ते खास शाहरुख खानला भेटण्यासाठी गुजरातवरून आले आहेत. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परवानगीशिवाय घरात प्रवेश करण्याबरोबरच इतर कलमांतर्गत या तरुणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in