Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

Money Laundering Case Filed Against Elvish Yadav: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून एल्विश यादवला लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. सापाच्या विषाच्या व्यवसायातून मिळालेल्या पैशाची चौकशी होणार.
Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!
Published on

Elvish Yadav Snake Venom Case: युट्युबर आणि बिग बॉस ओटीटी-२ विजेता एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सापाच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप झाल्यानंतर आता तो मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातही अडकला आहे. या प्रकरणी युट्युबरला मार्चमध्येच अटक करण्यात आली होती आणि त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा तो अडचणीत आला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार लवकरच ईडीच्या लखनऊ विभागीय कार्यालयाकडून त्याची चौकशी करण्याचे आदेश येऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे. ईडी मुख्यालयाच्या सूचनेनुसार लखनऊ येथील झोन कार्यालयाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ईडी कोणत्या गोष्टींची चौकशी करणार?

ईडी सापाच्या विषाच्या व्यवसायातून मिळालेल्या कथित पैशाची आणि रेव्ह पार्ट्या आयोजित करण्यासाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केल्याची चौकशी करेल. या सर्वात एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी १७ मार्च रोजी सापाच्या विष प्रकरणात अटक केली होती. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पाच दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. भाजप खासदार मनेका गांधी यांच्या पीपल फॉर ॲनिमल्स या संस्थेचे अधिकारी गौरव गुप्ता यांच्या तक्रारीनंतर हे सर्व प्रकरण सुरू झाले.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीच्या प्राथमिक तपासणीनुसार, दिल्ली-एनसीआरमधील प्रसिद्ध हॉटेल्स, क्लब, रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसमध्ये आयोजित रेव्ह पार्ट्यांना सापाचे विष दिले गेले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सामील असलेल्या सर्व मध्यस्थांना बोलावणे जाईल अशीही माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एल्विश यादवला लवकरच समन्स बजावले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in