
काल(19 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपची फायनल मॅच पार पडली. या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकला आहे. काल अनेक मराठी कलाकार देखील घरबसल्या सामन्याचा आनंद घेत होते. मिथीला पालकर, मृण्मयी देशपांडे हे कलाकार सामना पाहायला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेले होते. तर काही कलाकारांनी मॅचचा आनंद घरबसल्या घेतला आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी यांनी फेसबुकर पोस्ट केली आहे की, "हरणे, जिंकणे यालाच खेळ म्हणतात. फायनलपर्यंत अजिंक्य असलेल्या इंडिया टीमचे आणि विजेत्या ऑस्ट्रेलिया टीमचे अभिनंदन.. वेल डन टीम इंडिया. "लेखक - अभिनेता हृषिकेश जोशी यांनी देखील फेसबुकवर पोस्ट केली आहे की, दोन्ही टिम्स मध्ये आज फरक होता तो 'Head'...चा Congratulations Aus....and team India we enjoyed the entire tournament
मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. हेमांगी घरबसल्या मॅच बघत होती. पण जसे भारताचे विकेट पडत होते तसं तिने, म्हणुन मी मॅच बघत नाही अशी पोस्ट केली. पुढे विराट कोहली आऊट झाल्यावर तिने टीव्हीच बंद केला. त्यानंतर बिल्डींगखाली असलेल्या मालवणी जत्रेत जाण्याची स्टोरी तिन पोस्ट केली.
शेवटी भारताची हार झाल्यावर हेमांगी कवीने लिहलं की, We Love You,एक हार हमारा प्यार कम नही कर सकता. तुम्ही सलग १० सामने जिंकला आहात यार. अशाप्रकारे सर्व मराठी कलाकारांनी भारताला सपोर्ट केला आहे.