Elvish Yadav FIR : विदेशी महिलांसोबत नशा, विषारी सापांची तस्करी ; बिग बॉस विजेता एल्विश यादवने आरोप फेटाळले

एल्विशने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Elvish Yadav FIR : विदेशी महिलांसोबत नशा, विषारी सापांची तस्करी ; बिग बॉस विजेता एल्विश यादवने आरोप फेटाळले

बिग बॉस ओटीटी -२ विजेता एल्विश यादव हा चर्चेत आला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडातील रेव पार्टीवरील छापेमारीदरम्यान एल्विश यादवसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनी आत्तापर्यंत तीन राज्यांत छापेमारी केली आहे. एल्विशने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून आपल्यावरील अरोप खोटे असल्याचं त्यांने म्हटलं आहे.

एल्विशचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु आहे. अद्याप एल्विश पोलिसांना सापडला नाही. छापेमारी केलेल्या रेव पार्टीतून पोलिसांनी ९ साप जप्त केले आहेत. यात पाच कोबरा, एक अजगर आणि दोन साप आहेत. पोलिसांनी या रेव पार्टीतून २० एमएल विषही जप्त केलं आहे. तसंच पाच जणांना अटक देखील केली आहे.या पार्टीत विदेशातील महिलांसोबत नशा केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. एल्विश यादवला अटक करण्याची मागणी सध्या जोर धरु लागली आहे.

बिग बॉसचा विजेता एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासह एकूण सात जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच बरोबर एल्विशवर विषारी सापांची तस्करी करण्याता देखील आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसून आपण पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचं एल्विश यादव म्हणाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in