14 जूनपासून सिनेमागृहांत 'इमर्जन्सी' लागू" , कंगनाने हटके स्टाईलमध्ये जाहीर केली चित्रपटाची रिलीज डेट

गेल्या वर्षभरापासून कंगना विविध पोस्टच्या माध्यमातून 'इमर्जन्सी' सिनेमाबद्दल अपडेट देत होती.
14 जूनपासून सिनेमागृहांत 'इमर्जन्सी' लागू" ,  कंगनाने हटके स्टाईलमध्ये जाहीर केली चित्रपटाची रिलीज डेट
PM

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतच्या आगामी बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' सिनेमाच्या रिलीज डेटची अखेर घोषणा झाली आहे. गेल्या वर्षभरापासून कंगना विविध पोस्टच्या माध्यमातून 'इमर्जन्सी' सिनेमाबद्दल अपडेट देत होती. यात कंगना भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

पोस्टरद्वारे जाहीर केली तारीख-

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख कंगनाने एका पोस्टरद्वारे जाहीर केली आहे. '14 जूनपासून सिनेमागृहांत इमर्जन्सी लागू. भारतातील सर्वात गडद तासामागील कथा अनलॉक करा. 14 जून 2024 रोजी आणीबाणीची घोषणा करत आहोत, सर्वात भीतीदायक पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गर्जनेने इतिहास पुन्हा जिवंत होतो, त्याचे साक्षीदार व्हा', असे तिने कॅप्शन दिले आहे.

हे कलाकार आहेत -

या चित्रपटात कंगनासह अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्याही भूमिका आहेत. रितेश शाह यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in