Dream Girl 2 : 'ड्रीम गर्ल 2'मध्येही 'पुजा'चा जलवा कायम ; प्रेक्षकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

'ड्रीम गर्ल 2' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाबाबत भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Dream Girl 2 : 'ड्रीम गर्ल 2'मध्येही 'पुजा'चा जलवा कायम ; प्रेक्षकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून सनी देओलचा 'गदर २' आणि अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड २' या दोन चित्रपटांनी धुमाकुळ घातला आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटांनी अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. अशात त्याच्या जोडीला आज एका नव्या चित्रपटाने एन्ट्री केली आहे. आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा बहुचर्चित कॉमेडी चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2 ) या चित्रपटाची टिम प्रमोशनामध्ये व्यस्त होती. 'ड्रीम गर्ल' या सिनेमाला प्रेक्षकांचं खुप प्रेम मिळालं होतं. आता या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या पसंतीस किती उतरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने ट्विट करत लिहिलं आहे की, "'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट एक मनोरंजनचा धमाका आहे. यात आयुष्मान खुराना(Ayushman Khurana) पूजाच्या भूमिकेत आहे. तिचा आवाज सर्वांना आवडतो. यात तिला परत एकदा एका नवीन आव्हानाचा सामना करावा लागतोय. अनन्या पांडे चित्रपटात त्याची सहकलाकार आणि क्रश आहे. या चित्रपटात तुम्हाला तुफान कॉमेडी, रोमान्स आणि ड्रामा पाहयला मिळेल."

तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की , "'ड्रीम गर्ल 2' हा एक खूपच मजेदार आणि मनोरंजन करणारा चित्रपट आहे. हा सिनेमा तुम्हाला सगळयांना सुरुवातीपासून शेवटापर्यंत हसवतो. हा चित्रपट मजेदार संवाद आणि विनोदाने भरलेला आहे." तर 'ड्रीम गर्ल 2' पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी या सिनेमाला आयुष्मान खुरानाचा आत्तापर्यंतचा सर्वात हिट सिनेमा, असं सांगितला आहे .एकानं लिहिलं आहे की, "खरा रिव्ह्यू आहे. 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट एकदम हिट आहे. आयुष्मान खुरानाचा अभिनय सुपरहिट आहे... पूजा ही परत आली आहे. अनु कपूर हे देखील खूप मजेदार आहेत, परेश रावल यांचा अभिनय शानदार आहे."

'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत. चित्रपटाच्या मुख्य स्टारकास्टशिवाय, चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, असरानी, ​​अभिषेक बॅनर्जी, अन्नू कपूर आणि सीमा पाहवाही यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती मजल मारतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in