'या' प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; बाथरुमध्ये आढळून आला मृतदेह

आदित्यचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, ड्रग्जचे अतिसेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
'या' प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; बाथरुमध्ये आढळून आला मृतदेह

प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल व कास्टींग दिग्दर्शक आदित्य सिंह राजपूत याचे निधन झाले आहे. आज (22 मे) दुपारी मुंबईतील अंधेरी येथील घरात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. आदित्यचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, ड्रग्जचे अतिसेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

आदित्य अंधेरीतील एका इमारतीत 11 व्या मजल्यावर राहत होता. त्याच्या मित्रांना बाथरुममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर त्यांनी वॉचमॅनच्या मदतीने त्याला तात्काळ रुग्णालात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून आदित्यला मृत घोषीत केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

आदित्यने मॉडेलिंगपासून आपल्या करियरला सुरुवात केली होती. त्याने 300 हुन अधिक जाहीरातींमध्ये काम केले आहे. तसेच अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. 'मैने गांधी को नही मारा' आणि 'क्रांतीविर' या चित्रपटात देखील त्याने काम केले होते. 'गंदी बात' या वेब सीरिजमध्ये देखील त्याने काम केले आहे. तसेच त्याने पॉप कल्चर या सुरु केलेल्या ब्रँडच्या माध्यमातून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in