प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सीमा देव या गेल्या काही वर्षापासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. आज संध्याकाळी ४ वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सिनेजगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहगे. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं आहे. त्यांचा मुलगा अभिनय देव यांच्या मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी आज (२४ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी आपला देह त्यागला. गेल्या काही वर्षापासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. संध्याकाळी ४ वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सीमा देव यांनी जवळपास हिंदी मराठी मिळून ८० सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे.

सीमा देव यांनी अनेक सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. 'सरस्वतीचंद्र' (१९६८), 'आनंद' आणि 'ड्रिम गर्ल'(1977) या हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राव शोककळा पसरली आहे. सीमा देव यांचे पती रमेश देव हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय नावाजलेले कलाकार आहेत. त्यांच्या 'सुवासिनी'. 'जगाच्या पाठीवर', 'आनंद' या चित्रपटातील भूमिका विशेष गाजल्या. त्यांचा मुलगा अजिंक्य देव देखील प्रसिद्ध अभिनेता आहे.

'आलिया भोगासी' या १९५७ साली आलेल्या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. अनेक चित्रपटातील भूमिका लक्षवेधी ठरल्या. त्यांच्या निधनानं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in