प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री निधनाने खळबळ ; राहत्याघरी आढळून आला मृतदेह

अभिनेत्री अपर्णा ही केवळ ३१ वर्षांची होती. तिच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली असून संशय व्यक्त केला जात आहे
प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री निधनाने खळबळ ; राहत्याघरी आढळून आला मृतदेह

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री अपर्णा पी नायरचं निधन झालं आहे. अपर्णा गुरुवारी तिरुअनंतपुरममधील करमना येथील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. गुरुवारी सायंकाळी अपर्णा तिच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळली. तिला ताबतोब रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. अभिनेत्री अपर्णा ही केवळ ३१ वर्षांची होती. तिच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली असून संशय व्यक्त केला जात आहे

'मनोरमा' ने दिलेल्या वृत्तानुसार, करमना पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. अपर्णाच्या निधनाची बातमी कळताच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यानी ससंच मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी तिला श्रद्धांजली वाहत तिच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त केली आहे. अपर्णाने आतापर्यंत अनेक सुपरहिट मालिका तसंच चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. मल्याळम इंडस्ट्रीत तिच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.

अपर्णाने 'चंदनमाळा', 'आत्मसखी', 'मैथिली वेंदुम वरुम' आणि 'देवस्पर्शम' यांसारखे टीव्हीशो केले आहेत. तिने 'मेघातीर्थम', 'मुथुगौ', 'आचायंस', 'कोडथी समक्षम बालन वकील' आणि 'कल्की' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in