'हा' प्रसिद्ध गायक येणार अडचणीत; भर कार्यक्रमात केला गोळीबार

दादुसने मुंबईतील शिवडी येथे एका हळदीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. शिवडीत एका हळदीच्या कार्यक्रमात दादुसच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.
'हा' प्रसिद्ध गायक येणार अडचणीत; भर कार्यक्रमात केला गोळीबार

गायक दादुस उर्फ संतोष चौधरी आगरी कोळी गाणे म्हणण्यासाठी प्रसिद्ध आहे. आगरी आणि कोळी हळदी आणि लग्न समारंभात त्यांच्या ऑर्केस्ट्राला विशेष मागणी असते. हा गायक बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्याने त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्यावेळी दादुस खुप चर्चेत आला होता. आता दादुस पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.

दादुसने मुंबईतील शिवडी येथे एका हळदीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. शिवडीत एका हळदीच्या कार्यक्रमात दादुसच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जोरदार गाण्याची मैफिल जमली होती. कार्यक्रम ऐन रंगात आल्यावर दादुसने आपल्या खिशातून बंदूक काढून हवेत गोळीबार केला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर गोळाबाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांकडून दादुस उर्फ संतोष चौधरीला चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे तो अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in