Farmani Naaz : गायिका फरमानी नाजच्या वडिल आणि भावाला अटक ; पोलिसांनी केला मोठा खुलासा

काही महिन्यांपूर्वी फरमानीच्या चुलत भाऊ खुर्शीदची चाकूनं भोकसून हत्या करण्यात आली होती
Farmani Naaz : गायिका फरमानी नाजच्या वडिल आणि भावाला अटक ; पोलिसांनी केला मोठा खुलासा

'हर हर शंभू' गाण्याची गायिका फरमानी ही काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी फरमानीच्या चुलत भाऊ खुर्शीदची चाकूनं भोकसून हत्या करण्यात आली होती. आता तिच्या भावाच्या हत्येचं गुढ उकललं आहे.

मुझफ्फरनगर पोलिसांनी तिच्या कुटुंबाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. फरमानीचा भाऊ आणि वडिलांसह अन्य २ जणांना अटक करण्यात आली आहे. तिच्या चुलत भावाच्या हत्येचा कट रचण्याचा आरोप तिचा भाऊ आणि वडिलांवर करण्यात आला आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेले दोन चाकू आणि एक दुचाकी देखील जप्त केली आहे.

रतनपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहम्मदपूर माफी गावात ५ ऑगस्ट रोजी काही दुचाकीस्वार हल्लेखोरांनी खुर्शीदवर चाकूने हल्ला केला होता. खुर्शीदला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं होतं. दरम्यान, या घटनेमागे फरमानीचाच भाऊ आणि वडील असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गायक फरमानी नाजचे वजडी आरिफ आणि भाऊ फरमान यांच्यासह अन्य दोन आरोपी फरियाद आणि झाकीर यांना अटक केली आहे.

अनैतिक संबंधांच्या संशयावरुन हत्या

फरमानी नाजचे वडील आरिफ आणि भाऊ फरमान यांनी अन्य दोन साथिदारांच्या मदतीने अनैतिक संबंधांच्या संशयावरुन खुर्शीदची हत्या केली. या घटनेत खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना चौकशीनंतर तुरुंगात पाठवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in