Superstar Krishna : आई, भावानंतर आता वडिलांचेदेखील निधन; महेशबाबूसह टॉलिवूडवर शोककळा

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) याचे वडील अभिनेता कृष्णा (Superstar Krishna) हेदेखील होते सुपरस्टार. टॉलिवूडमधून सर्व अभिनेत्यांनी वाहिली श्रद्धांजली...
Superstar Krishna : आई, भावानंतर आता वडिलांचेदेखील निधन; महेशबाबूसह टॉलिवूडवर शोककळा

अगदी काहीच दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबू (Mahesh Babu) याला मातृशोक झाला होता. यानंतर आता त्याचे वडील ज्येष्ठ अभिनेता आणि टॉलिवूड सुपरस्टार अभिनेता कृष्णा (Superstar Krishna) यांचेही निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. त्यांना १४ नोव्हेंबरला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, १५ नोव्हेंबरला पहाटे त्यांच्या निधनाची बातमे समोर आली. यामुळे संपूर्ण टॉलिवूड क्षेत्रावर शोककळा पसरली.

२०२२मध्ये महेशबाबूच्या घरावर खूप मोठा डोंगर कोसळला आहे. जानेवारीमध्ये त्याचा भाऊ रमेश बाबू याचे निधन झाले. तर, सप्टेंबरमध्ये त्याच्या आईचे निधन झाले. त्यामुळे आता संपूर्ण टॉलिवूड क्षेत्राकडून महेशबाबूचे सांत्वन करण्यात येत आहे. सुपरस्टार कृष्णा हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले, "१५ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजून १५ मिनिटांनी त्यांना आपत्कालीन विभागात नेण्यात आले आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. अभिनेते कृष्णा यांना सीपीआर देण्यात आले होते आणि पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते."

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in