Fighter Teaser Out: हृतिक रोशनच्या 'फायटर'चा टीझर आउट; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

'फायटर'च्या या 1 मिनिट 13 सेकंदाच्या टीझरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या दमदार लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Fighter Teaser Out: हृतिक रोशनच्या 'फायटर'चा टीझर आउट; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

मागील काही दिवसांनापासून बॉलीवूडमध्ये चित्रपटांची जत्राचं भरली आहे. एकामोगोमाग एक सुपरहिट चित्रपटांची मेजवानी सिनेरसिकांना मिळत आहे. अशातचं आज बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या 'फायटर' या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधील अॅक्शन सीन्सने अनेकांचे लक्ष वेधलं आहे.

'फायटर'च्या या 1 मिनिट 13 सेकंदाच्या टीझरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या दमदार लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे. टीझरमध्ये हृतिक रोशन हातात राष्ट्रध्वज घेऊन हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहे. या सीनच्या बॅकग्राऊंडला वंदे मातरम हे संगीत ऐकू येत आहे.

'फायटर' या चित्रपटाच्या टीझरमध्ये हृतिक रोशन आणि दीपिकाची जबरदस्त केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. या दोघांचा लिप-लॉक सीन देखील टीझरमध्ये बघायला मिळत आहे. दीपिकाने 'फायटर' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला तिने,"फायटर फॉरेवर" असे कॅप्शन दिले आहे.

'फायटर' या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत असतील. या चित्रपटात हृतिक हा स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया उर्फ पॅटी या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पदुकोण ही स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ मिनी ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर हे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन राकेश जयसिंह उर्फ रॉकी या दमदार भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग फार उत्सुक आहेत.

सिद्धार्थ आनंद यांनी 'फायटर' या चित्रपटाचे दिग्दर्शिन केलं आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंद यांच्या 'वॉर', 'बँग बँग' या चित्रपटांचे अनेकांनी कौतुक केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in